2000₹ ची नोट चलनातून बाद, रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय.

भारताचे रिझर्व बँक ऑफ इंडियाने काल म्हणजेच 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांचा नोटा चलनातून बाद होणार आहेत अशी घोषणा केली आहे तरीही बँकेने नागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे नोटा बदलून घेण्यासाठी. 'RESERVE BANK'


Reserve-Bank-of-India
RBI 


नोटबंदी का केली जाते?


आपल्या भारतात होणारा भ्रष्टाचार पाहता, भ्रष्टाचार कमी करण्यासाठी नोटबंदी केली जाते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने खूप सार्‍या नोटा आपल्या घरात दडपून ठेवल्या असतील आणि त्याचा कुठलाच पाठपुरावा त्याने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा जीएसटी डिपार्टमेंट किंवा सरकारकडे केलेला नसेल तर अशा पैशाला काळा पैसा किंवा ब्लॅक मनी असे म्हटले जाते. नोटबंदी ही अचानक केली जाते जेणेकरून भविष्यात होणाऱ्या नोटबंदीचा कुणालाच सुगावा लागू नये व अचानक केलेल्या नोटबंदीमुळे असे घरात ठेवलेले काळे पैसे चलनातून बाद होतील व त्यांचे मूल्य शून्य होईल आणि तो काळा पैसा आपोआपच नष्ट होईल. 


Reserve Bank of India

वस्तूंच्या किमती कमी जास्त का होतात?


मित्रांनो, आपण नेहमी अनुभवले की बाजारात ज्या वस्तू असतात त्यांच्या किमती हमेशा कमी किंवा जास्त होत असतात. आपल्याला कधी ना कधी असा प्रश्न नक्कीच पडला असेल की या वस्तू च्या किमती कमी किंवा जास्त का होतात किंवा या वस्तूंच्या किमती कमी जास्त होण्यामागे कोणते घटक कारणीभूत असतील?


तर, आज आपण याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर बघणार आहोत. मित्रांनो वस्तूंच्या किमती कमी जास्त होण्यामागे दोन घटक कारणीभूत असतात. त्यातला पहिला घटक म्हणजे मागणी आणि दुसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे पुरवठा.


मित्रांनो बाजारातली मागणी वाढली की वस्तूंच्या किमती वाढतात आणि मागणी कमी झाली की वस्तूंच्या किमती कमी होतात.


त्याचप्रकारे बाजारातल्या वस्तूंचा पुरवठा बाजारात जास्त झाला की त्याची किंमत कमी होते आणि बाजारातल्या वस्तूंचा पुरवठा बाजारात कमी झाला तर त्यांची किंमत वाढते.


"Reserve Bank of India"

उदाहरण देऊन सांगतो. लॉक डाऊन चा कालावधी होता आणि मला त्यावेळेस अर्जंट मध्ये मोबाईल घ्यायचा होता. लॉकडाऊन सुरू असल्याने पुरवठा साखळी एकदम स्तब्ध झाली होती आणि मोबाईलचा पुरवठा दुकानांमध्ये खूप कमी होता. त्यामुळे मोबाईलचा पुरवठा दुकानांमध्येच कमी असल्यामुळे मोबाईलच्या किमती दाम दुप्पट झाल्या होत्या आणि लोकांची त्यावेळेस मागणी खूप जास्त वाढली होती. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येईल की वस्तूंचा पुरवठा बाजारात कमी झाला आणि लोकांची मागणी वाढली की वस्तूंच्या किमती वाढतात.


अजून एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया. समजा आपल्या पूर्ण भारत देशामध्ये टमाट्यांचं एकच दुकान आहे आणि भारतातली सगळी लोकं टमाटे घेण्यासाठी त्याच एका दुकानावर जातात. समजा काही कारणाने टमाट्यांची जी मागणी आहे ती बाजारात खूप जास्त झाली म्हणजे खूप लोक ते टमाटे घेऊ लागले तर त्या टमाट्यांची जी किंमत असते ती वाढते. समजा दुष्काळ पडला आणि टमाट्यांचे पीकच आलं नाही आणि टमाट्यांचा पुरवठा बाजारामध्ये खूप कमी झाला तर त्या पुरवठा कमी झाल्यामुळे त्या टमाट्यांचा भाव वाढतो आणि टमाट्यांच जर खूप जास्त पिक आल असेल आणि खूप जास्त टमाटे दुकानांमध्ये विक्रीला आले असतील तर त्या टमाट्यांची किंमत कमी होते.