आपल्या देशात केंद्र सरकार व राज्य सरकार हे देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी खुप साऱ्या, विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवत असतात. पण ह्या योजना खुप कमी लोकांना माहिती असतात. अशाच एका योजनेची माहिती आज आपण इथे बघणार आहोत. माहिती चांगली वाटल्यास व या योजनेचा लाभ झाल्यास हे पेज आपल्या मित्रांना नक्की शेयर करा.


ही योजना म्हणजे अटल पेंशन योजना Atal Pension yojana. हि योजना केंद्र सरकरमार्फत रबविली जाते. ही योजना सामाजिक सुरक्षा योजनेच्या अंतर्गत लिहिली जाऊ शकते. हि योजना एक खूप लोकप्रिय योजना असून आतापर्यंत करोडो लोकांनी या योजनेला नोंदणी करून ठेवली आहे.


अटल पेंशन योजनेची सुरुवात ९ मे २०१५ ला कोलकाता येथून पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली होती. हि एक अशी योजना आहे जी गरीब लोकांना त्यांचं म्हातारपण गौरवाने जगण्यासाठी शाश्वती प्रदान करते.


Atal Pension Yojana (APY)
Atal-pension-yojana


Atal Pension Yojana (APY) 

अटल पेंशन योजनेसाठी पात्रता - "ATAL PENSION YOJANA AGE LIMIT" 



अटल पेंशन योजनेचे खाते उघडण्यासाठी ग्राहक हा भारताचा नागरिक असावा लागतो.


अटल पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची वयोमर्यादा ही १८ ते ४० च्या आत असावी लागते. म्हणजे त्या व्यक्ती चे वय १८ च्या खाली नसावे व ४० च्या वर नसावे. अटल पेंशन योजना जी मुख्यतः असंघटीत क्षेत्रातील लोकांसाठी सुरू करण्यात आली होती. 'government pension scheme'


१८ ते ४० वर्षे वयोगटतील असंघटित क्षेत्रातील लोक या योजनेस पात्र आहेत. अटल पेंशन योजनेअंतर्गत ६० वर्षे वयानंतर पेंशन मिळते. म्हणजे किमान २० वर्षे व त्याहून जास्त वर्षे हप्ता भरावा लागतो.  'अटल पेंशन योजना'


०१/१०/२०२२ पासून आयकर भरणारे नागरिक हे अटल पेंशन योजनेत सामील होण्यास मात्र पात्र नाहीत.


APY खाते उघडताना  नॉमिनेशन आणि जोडीदाराचा तपशील देणे बंधनकारक असते.


अटल पेंशन योजनेचा लाभ (Benefits of Atal Pension Yojana) - 



वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना १००० रु., २००० रू., ३००० रु., ४००० रु., ५००० रुपायांची न्यूनतम शाश्वती प्रदान करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची ६० वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे. Retirement planning


पॉलिसी धारकांच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीलाही तीच राशी मिळत राहणार आहे. जर. मुख्य पॉलिसी धारकांच्या पत्नीचाही मृत्यू झाला तर मात्र ती पूर्ण रक्कम त्यांच्या लेकरांना प्रदान करण्यात येते.


अटल पेंशन योजनेचे व्यवस्थापन PFRDA मार्फत केले जाते. अटल पेंशन योजना 




अटल पेंशन योजनेचा हप्ता व शासनाचा वाटा (Installmens of Atal Pension Yojana and Share of Government) - 



या योजनेसाठी हप्त्याची वार्षिक रक्कम ४२ रु. ते १,४५४ रु. आहे. हि रक्कम लाभार्थ्यांच्या सुरुवातीच्या वयावर व क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे जर २० वर्षाचा मुलगा योजनेला नोंदणी करून पैसे भरत असेल तर त्याला ५० वर्षे वयाच्या व्यक्तीच्या तुलनेत कमी पैसे भरावे लागतील.


अर्थातच ज्याचे वय कमी असते तो कमी रक्कम भरू शकतो. सुरुवातीची ५ वर्षे शासन या हप्त्यातील अर्धी रक्कम (कमाल १००० रू.) भरत असते.


अटल पेंशन योजनेला नाव नोंदविल्यानंतर वर्षातून एकदा नोंदणीकृत पत्त्यावर म्हणजेच अटल पेंशन योजनेत नोंदणी करण्यासाठी ग्राहकाने दिलेल्या पत्त्यावर फिजिकल व्यवहाराचे विवरण पाठवले जात असते.


APY मोबाईल ॲपलिकेशन APY MOBILE APPLICATION -



अटल पेंशन योजनेला नोंदणी केलेल्या नागरिकांसाठी APY हे मोबाईल एप्लिकेशन्स विनामूल्य वापरासाठी उपलब्ध आहे. या ॲप मध्ये अलिकडील ५ योगदान तपासले जाऊ शकतात.


APY MOBILE APP मध्ये व्यवहार विवरण आणि E-PRAN हे विनामूल्य कधीही डाऊनलोड केले जाऊ शकते.


अँड्रॉइड वापरकर्ते प्ले स्टोअरवर जाऊन APY असे सर्च करून हे ॲप डाऊनलोड करून घेऊ शकतात.


APY मोबाईल ॲप मध्ये APY CHATBOT हे एक नावीन्यपूर्ण वैशिष्ट्य चालू केले गेले आहे जे मानवी हस्तक्षेप नसताना आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी समर्थ आहे.


APY ॲप मध्ये श्रेणीसुधारित/ डाऊन ग्रेड कॅल्क्युलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. Atal Pension Yojana 


६० वर्षानंतर नेमका कोणता लाभ मिळणार आहे हे तेव्हा स्वावलंबी योजनेत स्पष्ट नव्हते त्यामुळे स्वावलंबी योजना म्हणावी तितकी यशस्वी झाली नाही. त्यामुळे वार्षिक अत्यल्प हप्ता व पेंशन लाभाची सुस्पष्टता असणारी अटल पेंशन योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता स्वावलंबन योजना अटल पेंशन योजनेत विलीन करण्यात आली आहे आणि सर्व स्वावलंबन खाती अटल पेंशन योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. "pension plan for senior citizens"



अटल पेंशन योजनेसाठी कुठे नोंदणी करावी लागते ? Where can we register for Atal Pension Yojana ?


अटल पेंशन योजनेसाठी नोंदणी करायची असल्यास SBI बँकेचे ग्राहक सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करता येईल.



अटल पेंशन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे (Documents required for Atal Pension Yojana) -


१) आपल्या बँकेचे पासबुक.
२) आधार कार्ड व झेरॉक्स. 
३) PAN कार्ड व झेरॉक्स सोबत ठेवावे. मागितले तर देता येईल.
४) पासपोर्ट साईज फोटो.
५) e-mail id व आपला मोबाईल जवळ असेल तर चांगलं.

अटल पेंशन योजनेला नोंदणी केल्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर मध्ये भरलेल्या फॉर्म ची एक कॉपी देण्यात येते.


आणाखी चांगली माहिती मिळावी यासाठी हा व्हिडिओ बघा. वा लगेच SBI ग्राहक सेवा केंद्रात जाऊन नोंदणी करा.




मला माझी पेन्शन कधी मिळेल?

 पेन्शन सुरू करण्याचे वय ६० वर्षे असेल.

मी स्वावलंबन सदस्य आहे. मी अजूनही एपीवायसाठी अर्ज करू शकतो का?

 18-40 वर्षे वयोगटातील सर्व नोंदणीकृत स्वावलंबन सदस्य स्वयंचलितपणे APY मध्ये स्थलांतरित होतील

योजनेत सामील होताना नामांकन देणे आवश्यक आहे का?

 होय. APY खात्यात नामनिर्देशित तपशील प्रदान करणे अनिवार्य आहे.

डिफॉल्ट नॉमिनी किंवा रक्ताच्या नात्याची काही तरतूद आहे का?

 जर सदस्य अविवाहित असेल तर ते इतर कोणत्याही व्यक्तीस नॉमिनी म्हणून नामनिर्देशित करू शकतात आणि त्यांना लग्नानंतर जोडीदाराचा तपशील द्यावा लागेल. विवाहित असल्यास, जोडीदार डिफॉल्ट नॉमिनी असेल. जोडीदार आणि नामनिर्देशित व्यक्तींचे आधार तपशील प्रदान केले जाऊ शकतात.

विलंब कालावधी काय होईल?

  एपी देय देयखेच्या उशीर पोलीस विलंबित थकबाकीसाठी तार ग्राहक थकले.

मला माझ्या योगदानाची स्थिती कशी कळेल?

 PRAN चे सक्रियकरण, खात्यातील शिल्लक, योगदान क्रेडिट्स इत्यादींबाबत सदस्यांना नियतकालिक माहिती नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस अलर्टद्वारे APY सदस्यांना सूचित केली जाईल किंवा NSDL द्वारे लॉन्च केलेल्या मोबाइल/APY अॅपद्वारे ऍक्सेस करता येईल. सबस्क्राइबरला त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर आर्थिक वर्षातून एकदा खात्याचे भौतिक विवरण देखील प्राप्त होईल.

योजनेत सामील होण्यासाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे का?

 APY अंतर्गत असे लाभ प्राप्त करण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांकाचा पुरावा सादर करावा लागेल किंवा आधार प्रमाणीकरण अंतर्गत नावनोंदणी करावी लागेल.

केंद्र/राज्य सरकारचे कर्मचारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि/किंवा एनपीएस सदस्य APY चे सदस्यत्व घेऊ शकतात का?

 होय, 18 - 40 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक, या योजनेंतर्गत भारत सरकारद्वारे हमी दिलेले फायदे मिळवण्यासाठी, सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील त्याच्या/तिच्या रोजगाराच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून APY योजनेत सामील होऊ शकतो. याशिवाय, विद्यमान NPS सदस्य APY चे सदस्यत्व घेऊ शकतात, जर तो/ती भारत सरकारने हमी दिलेले फायदे मिळवण्यासाठी मूलभूत पात्रता निकष पूर्ण करत असेल; योजने अंतर्गत.

मी बचत बँक खात्याशिवाय APY खाते उघडू शकतो का?

 नाही, APY मध्ये सामील होण्यासाठी बचत बँक खाते/ पोस्ट ऑफिस बचत बँक खाते अनिवार्य आहे.

मी 40 वर्षे पूर्ण केली असल्यास, मी अटल पेन्शन योजनेत सामील होऊ शकतो का?

 नाही, सध्या 18 वर्षे ते 39 वर्षे 364 दिवस वयोगटातील व्यक्ती अटल पेन्शन योजनेत सामील होऊ शकते.