Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) आपल्या भारत देशात खूप साऱ्या योजना राबवल्या जातात काही योजना केंद्र सरकारने सुरू केलेल्या असतात तर काही योजना राज्य सरकार मार्फत सुरु करण्यात आलेल्या असतात.
आपल्या समाजातील विविध घटकांसाठी विविध योजना राबविल्या जात असतात. जसे की महीलांसाठी वेगळ्या योजना ( प्रधानमंत्री मातृ वंदना योजना) , शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना (प्रधानमंत्री पीक विमा योजना), बालकांसाठी वेगळ्या योजना , वृद्धांसाठी वेगळ्या योजना (अटल पेंशन योजना), सैन्यदलातील कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या योजना (आयुष्मान CAPF), आरोग्यासाठी वेगळ्या योजना (आयुष्मान भारत योजना), सामाजिक सुरक्षेसाठी वेगळ्या योजना (प्रधानमंत्री जन धन योजना), भौतिक सुविधांसाठी वेगळ्या योजना (उज्ज्वला योजना), रोजगारासाठी वेगळ्या योजना (मनरेगा), विमा सुरक्षेसाठी वेगळ्या योजना (प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना), घरे बांधण्यासाठी वेगळ्या योजना (प्रधानमंत्री आवास योजना), स्वच्छतेसाठी वेगळ्या योजना ( स्वच्छ भारत अभियान), शिक्षणासाठी वेगळया योजना (पढे भारत, बढे भारत) इत्यादी.
ह्या योजनांचा उद्देश्य समाजातील गरीब व दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांची प्रगती करविने हा असतो जेणेकरून त्यांचं जीवनमान उंचावले जाईल.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana
अशा योजनांचा उद्देश हा पण असतो की त्यामुळे समाजातील गरीब व श्रीमंत घटकांतील आर्थिक विषमतेची दरी कमी करणे. श्रीमंत लोक जो काही कर भरत असतात त्या करातून मिळालेली राशी ही गरीब घटकांतील लोकांच्या कल्याणासाठी सरकार कल्याणकारी योजना राबवत असते. ह्यामुळे गरीब घटकांतील नागरिकांचे. जीवनमान उंचावण्यास मदत होते.
आज आपण एका अशाच महत्त्वपूर्ण योजने विषयी माहिती देणार आहोत. जेणकरून अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा. सरकार खूप साऱ्या कल्याणकारी योजना राबवत असते पण या योजनेची माहिती खूप साऱ्या लोकांना नसते. तर आता माहिती वाचा आणि पात्र असाल तर लगेच नोंदणी करा.
ह्या योजनेची सुरुवात ०१ जानेवारी २०१७ रोजी करण्यात आली होती.
मातृत्व योजनेचा लाभ देणाऱ्या ह्या योजनेचा आवाका देशभर वाढवला जाईल, अशी घोषणा तत्कालीन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर २०१७ ला केली होती. 'Pradhan Mantri Matru Vandana Yojana'
प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचा उद्देश Motive of Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)
तसे पाहायला गेले तर आपल्या भारत देशात प्रत्येक तीन स्त्रियांमागे एक स्त्री ही कुपोषित असल्याचे आढळते. तसेच प्रत्येक दोन स्त्रियांमागे एका स्त्री मध्ये रक्तशय असल्याचे आढळून येते. इतके असूनही ह्या स्त्रिया गरोदरपणातही काम करत असतात. त्यामुळे त्यांनी जन्माला घातलेली अपत्ये ही कमी वजनाची असल्याचे सामान्यत: दिसून येते.आता ही अपत्ये जगतील की नाही याची काही खात्री नसते.
मातांचे व बालकांचे पोषण, माता गरोदर असताना त्यांच्या बुडालेल्या रोजगाराची भरपाई, मातांचा उपचार व लसीकरण ह्या अशा सर्व बाबींचा विचार करून, त्यांना समोर ठेऊन, ह्या लोकांना आर्थिक स्वरूपात लाभ देणे, हा PMMVY अर्थातच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा उद्देश आहे.
माता जर काम करत असतील व त्यांचा जर रोजगार बुडालेला असेल तर त्यांच्या बुडालेल्या रोजगाराची अंशत: भरपाई करणे, की ज्यामुळे ती माता बाळंतपणाच्या आधी व बाळंतपनाच्या नंतर पुरेसा आराम जो आवश्यक असतो तो तिला घेता यावा. हे पण एक उद्देश आहे.
आणखी एक उद्देश म्हणजे गरोदर व स्तनदा मातांना रोख रकमेच्या स्वरूपात मदत देऊन त्यांच्या आरोग्यात सुधारणा करणे.
मातांचे मृत्यूचे प्रमाण व बालकांचा मृत्यूदर कमी होणे आणि माता व त्यांच्या बालकांचे पोषण होणे हे या योजनेचे अंतीम धेय आहे.
प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता Eligibility for Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो व्यक्तीने -
लाभार्थीने गरोदरपणाची नोंद आर. सी. एच. पोर्टलमध्ये ए. एन. एम. यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर 150 दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे.
गरोदरपणाची सहा महिन्याच्या आत अर्थातच 180 दिवसांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी होणे आवश्यक असते.
प्रसूतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद, बी. सी. जी., ओ. पी. व्ही., (झिरो डोस) यांची एक मात्रा तसेच pentavalent, ओ. पी. व्ही. लसीचे तीन मात्रा घेणे आवश्यक असते.
ज्या मातांची प्रसूती एक जानेवारी 2017 ला किंवा त्यानंतर झाली किंवा होणार आहे त्या योजनेस पात्र होत्या किंवा आहेत.
PMMVY
प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ Benefits of Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)
केंद्र सरकार द्वारे पुरस्कृत प्रधान मंत्री मातृ वंदना योजना कुटुंबातील पहिले जिवंत अपत्यापर्यंत त्या लाभार्थी महिलेला एकूण पाच हजार रुपये ५०००/- रु. चे आर्थिक सहाय्य हे टप्प्याटप्प्यात देण्यात येत असते.
या योजनेचा लाभ तीन टप्प्यांमध्ये देण्यात येत असतो. या योजनेत मिळणाऱ्या लाभ हा तीन टप्प्यांमध्ये दिला जात असून या सर्व रकमा बँका खात्यात किंवा पोस्ट खात्यात वर्ग केल्या जात असतात.
पहिल्या टप्प्यामध्ये - १०००/- रु.
गरोदर राहिल्याचे नोंद केल्यानंतर लाभार्थी मातेला एक हजार रुपये दिले जात असतात.
दुसऱ्या टप्प्यामध्ये - २०००/- रु.
गरोदर राहिल्यानंतर सहा महिन्याची लाभार्थी मातेला दोन हजार रुपये दिले जात असतात. यासाठी त्या मातेने किमान एक वेळा आरोग्य तपासणी करून घेणे अनिवार्य असते.
तिसऱ्या टप्प्यामध्ये -२०००/- रु.
प्रसूती नंतर बालकाची जन्म नोंद झाल्यावर मातेला दोन हजार रुपये दिले जातात. यासाठी जन्म दाखला व बालकाचा पहिल्या टप्प्यातील लसीकरण केल्याचा दाखला किंवा कार्ड दाखवणे अनिवार्य असते. Pradhan Mantri Matru Vandana Yojana
या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाले असल्यास मिळणारे आर्थिक सहाय्य देखील देय राहनार आहे. लाभार्थ्यांनी अटीची पूर्तता केल्यानंतर तीस दिवसांच्या आत लाभाची रक्कम ही अदा करण्यात येत असते.
या योजनेचा लाभ पाहिल्या जिवंत अपत्याला जन्म देतानाच मिळतो. अंगणवाडी ही योजना राबवण्यासाठी स्थानक आहे.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana PMMVY
प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ यांना घेता येणार नाही - Not eligible to apply for Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY) -
ज्या कुणी महिला केंद्र किंवा राज्य सरकार किंवा कोणत्याही सार्वजनिक उपक्रमांचा सोबत नियमित रोजगारांमध्ये सहभागी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. "PMMVY"
ज्या महिला त्याच्या समान लाभ घेत आहेत.
प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेच्या नोंदणी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Documents Required to apply for Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो लाभार्थी व त्यांच्या पतीचे आधार कार्ड महत्त्वाचे असते. लाभार्थ्यांचे बँकेचे खाते आवश्यक असते ज्याला आधार कार्ड जोडलेले असावे लागते.
गरोदरपणात शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंदणी करणे हे आवश्यक असते.
गरोदरपणाच्या दरम्यान शासकीय आरोग्य संस्थेमध्ये तपासणी केलेली असावी.
बाळाच्या जन्म नोंदणीचा दाखला व प्राथमिक लसीकरण हे महत्त्वाचे असते. Pradhan Mantri Matru Vandana Yojana
थोडक्यात,
०१) लाभार्थी व त्यांच्या पतीचे आधार कार्ड.
०२) लाभार्थ्यांचे बँकेचे खाते (आधार संलग्न).
०३) गरोदरपणाच्या दरम्यान शासकीय आरोग्य संस्थेमध्ये तपासणी. PMMVY
०४) बाळाच्या जन्म नोंदणीचा दाखला व प्राथमिक लसीकरण.
प्रधान मंत्री मातृ वंदना योजनेला नोंदणी करण्याचे ठिकाण Place to apply for Pradhan Mantri Matru Vandana Yojana (PMMVY)
लाभार्थी कोणत्याही शासकीय आरोग्य संस्थेत अर्थातच सरकारी दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये जाऊन प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेला नोंदणी करू शकतो व या योजनेचा चांगला फायदा घेऊ शकतो. तरीही जे कोणी पात्र लाभार्थी असतील त्यांनी या योजनेला नोंदणी करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क -
अधिक माहिती करिता आशा स्वयंसेविका/ अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य सेविका किंवा आरोग्य उपकेंद्र येथे संपर्क साधावा.
काही सामान्य प्रश्न व त्यांचे निरसन -
मी रोख प्रोत्साहनाच्या दुसऱ्या हप्त्यावर कधी दावा करू शकतो?
अर्जदाराच्या शेवटच्या मासिक पाळीच्या (LMP) नंतर 180 दिवसांनी दुसरा हप्ता दावा केला जाऊ शकतो.
ही योजना काही अतिरिक्त कव्हरेज प्रदान करते का?
150 दिवस, 180 दिवस आणि बाळंतपणाच्या वेळी दावा करावयाच्या तीन हप्त्यांव्यतिरिक्त, योजना अतिरिक्त कव्हरेज देत नाही.
मृत्यू झाल्यास PMMVY अंतर्गत लाभ चालू राहतो का?
नाही, मूल जिवंत न राहिल्याच्या दुर्दैवी घटनेत, लाभार्थी पुढील गर्भधारणेसाठी PMMVY अंतर्गत लाभांसाठी पात्र नाही कारण तिने आधीच हप्त्यांवर दावा केला आहे.
गर्भपात किंवा मृत जन्म झाल्यास लाभार्थीला लाभ मिळेल का?
गर्भधारणा सक्रिय होईपर्यंत लाभार्थीला हप्ते मिळतील. गर्भधारणेच्या टप्प्यांवर अवलंबून लाभ तीन हप्त्यांमध्ये अदा केला जात असल्याने, लाभार्थ्याला मृत जन्माच्या बाबतीत किमान दोन हप्ते मिळतील. लाभ चालू राहील की नाही हे ठरवण्यासाठी गर्भपाताची तारीख एक घटक असेल.
मला इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना (IGMSY) नावाच्या जुन्या “मातृत्व लाभ कार्यक्रम (MBP) अंतर्गत फक्त पहिला हप्ता मिळाला आहे. मी PMMVY अंतर्गत उर्वरित हप्त्यांवर दावा करू शकतो का?
जुन्या MBP (IGMSY) योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना फक्त पहिला हप्ता मिळाला आहे ते PMMVY योजनेंतर्गत फक्त तिसऱ्या हप्त्यावर दावा करू शकतात, PMMVY च्या निकषांची पूर्तता करून.
मला जुळ्या मुलांची अपेक्षा आहे, मी देखील या योजनेसाठी पात्र आहे का?
होय, तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र आहात.
मी आधीच माझ्या नियोक्त्याकडून सशुल्क प्रसूती रजा घेत आहे. मी या योजनेसाठी पात्र आहे का?
नाही, जर तुम्ही तुमच्या नियोक्त्याकडून आधीच कोणतीही सशुल्क प्रसूती योजना किंवा सशुल्क प्रसूती रजा घेत असाल, तर त्या बाबतीत तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही.
मी योजनेच्या सर्व पात्रता अटी पूर्ण करतो, तथापि, मी मुलाच्या जन्मानंतर योजनेचे लाभ मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. मी अजूनही अर्ज करण्यास पात्र आहे का?
लाभार्थी PMMVY योजनेअंतर्गत लाभांसाठी LMP तारखेपासून 730 दिवसांच्या आत किंवा मुलाच्या जन्माच्या तारखेपासून 460 दिवसांच्या आत (LMP तारखेची अनुपलब्धता असल्यास) योजनेंतर्गत इतर सर्व पात्रता निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून फायद्यांसाठी अर्ज करू शकतो.
योजनेअंतर्गत लाभांचा दावा करण्यासाठी शेवटची मासिक पाळी (LMP) तारीख अनिवार्य आहे का?
होय. मदर चाइल्ड प्रोटेक्शन (MCP) कार्डमध्ये आढळलेली LMP तारीख, पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी अनिवार्य आहे. जर LMP तारीख प्रदान केली गेली नसेल, तर लाभार्थी 1ल्या आणि 2र्या हप्त्यावर दावा करण्यास पात्र नाही आणि योजनेच्या तिसर्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी तिने अट पूर्ण केल्यास ती फक्त 3र्या हप्त्याचा दावा करू शकते.
अर्ज सादर करण्यासाठी एक कट ऑफ तारीख आहे का?
होय, लाभार्थी योजनेच्या पात्रतेच्या अटींच्या अधीन राहून लाभार्थीच्या शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 2 वर्षांच्या आत योजनेसाठी अर्ज करू शकतो.
0 Comments
हे कोणत्याही सरकारी योजने विषयीचे अधिकृत संकेतस्थळ नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. या संकेस्थळाला अधिकृत संकेस्थळ मानु नका व खाली कमेंट मध्ये आपला संपर्क, मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल सारखी कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका. आम्ही कोणत्याही योजने विषयीच्या तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजने बद्दल काही विचारायचे असल्यास किंवा या संकेस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करण्याची विनंती करतो.